वाशिम शहरातील कानडे इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना “जंक फूड पेक्षा, घरातील पौष्टिक जेवण, आरोग्यासाठी उत्तम” असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी एस.ठोंबरे यांनी मांडले.
या शिबिरात एकूण ७४६ जणांची तपासणी केली. त्यामध्ये सिकलसेल तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सीबीसी तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय काळे, कानडे इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका श्रीम. कानडे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्निल चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा चव्हाण, नागरी प्रा. आ. केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.ढोले, आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खुळे, नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीम.गांधी, डॉ. वीरू मनवर, तालुका विस्तार अधिकारी विठ्ठल ठाकरे, सिकल सेल समन्वयक पुरूषोत्तम इंगोले, टिबी कार्यक्रमाचे कर्मचारी सोनुने, तालुका सिकलसेल सहाय्यक गंगावणे, पिंपरकर, अक्षय वानखेडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व नागरी प्रा.आ.केंद्र व आपला दवाखाना यांची उपस्थिती होती.