तालुका क्रीडा संकुल मधील १ कोटी २० लाखाच्या विकास कामांचे संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन
मेहकर / प्रतिनिधी : येथील तालुका क्रीडा संकुलातील संरक्षण भिंत बांधकाम आणि बॅडमिंटन हॉल दुरुस्ती या एक कोटी २० लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते आज पार पडले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठीया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमानंतर बोलताना माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, मेहकर तालुका क्रीडा संकुलासाठी चार कोटी रुपये ,आणि लोणार साठी चार कोटी रुपये यापूर्वीच मी मंजूर करून आणले असून त्यापैकी मेहकर येथे एक कोटी वीस लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले. खेळाडूंसाठी विशेष धावपट्टी आणि संकुलाचे सौंदर्यीकरण, त्याचप्रमाणे प्रेक्षक गॅलरी निर्माण करणे, मैदानाचे सपाटीकरण आदी कामे करावयाची असून त्यासाठी निधीची कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही. राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून आणखी कामे मंजूर करून घेतली जातील. क्रीडा संकुलात देखभालीसाठी कर्मचारी होता ,परंतु अल्पमोबदला मिळत असल्याने सध्या