
साखरखेर्डा – दिनांक 13/11/2024 रोजी फिर्यादी नामेकिरणकुमार लिंगया कनुकुंटला वय 38 वर्ष रा. कल्यानी टावर जवळ चद्रपुर ता.जि.चद्रपुर यांनी पो स्टे बिबी येथे रिपोर्ट दिला की, मी समृध्दी महामार्गाने मुंबई त्ो नागपुर रोडने ट्रक घेवुन नागपुर कडे जात असतांना दुसरबिड टोलनाका जवळ रस्त्यावर वाहन थांबवुन आराम असतांना दिनांक 13/11/2024 रोजी रात्रीचे 03/00 वा चे सुमारास ट्रकच्या डिझेल टाकीतील अंदाजे 80 लिटर डिझेल कि. 7000/- रुपयेचे चोरुन नेले व माझ्या ट्रकचे काचाला दगड मारुन समोरील काच फोडुन अंदाजे 5000/- रुपयाचे नुकसान केले अशा रिपोर्ट वरुन पोस्टे बिबी अप नं.244/2024 कलम 303(2), 324 (4) भारतीय न्याय संहीता प्रमाणे दाखल करुन तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासत गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या खबर प्रमाणे तसेच तांत्रीक सांधनांचा वापर करुन कसोशीने तपास करुन आरोपी निष्पन्न करुन दिनांक 20/12/2024 रोत्री पो स्टे बिबी चे ठाणेदार सपोनि संदिप पाटील सह सफौ परमेश्वर शिंदे, नापोकॉ अरुण सानप, पोकॉ रविंद्र बोरे यांनी पो स्टे चिखली हददीत गजानन नगर चौफुलीवर गोपनिय बातमीच्या आधारे छापा टाकुन आरोपी नामे 1. लक्ष्मण ऊर्फ संतोष गुलाबराव लहाणे वय 27 वर्ष, रा. खंडाळा मकरध्वज ता. चिखली 2. निलेश संतोष भारुडकर वय 32 वर्ष, रा. सातगाव भुसारी ता.चिखली 3. देविदास प्रकाश दसरे वय 28 वर्ष, रा.साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा यांना पकडले त्यांचे कब्जात्ुान 1. स्कॉर्पीओ वाहन क्रमांक एम एच 28 व्हि 8409 किंमती 350000/रुपये 2. एक स्विप्ट डिझायर कार क्रमांक एम एच 12 एच झेड 5575 किंमती अंदाजे 3,00,000 रुपयेचे वाहन तसेच त्यातील 35 लिटर क्षमत्ोच्या रिकाम्या 4 कॅन असे साहीत्य जप्त करण्यात आले तसेच नमुद आरोपीतांनी गुन्हयातील डिझेल सचिन परसराम घुबे रा देऊळगाव घुबे याला विक्री केले आहे वरुन त्याला ताब्यात घेवुन विचारपसु केली असता त्याने डिझेल विकत घेतल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी नामे नामे 1. लक्ष्मण ऊर्फ संतोष गुलाबराव लहाणे वय 27 वर्ष, रा. खंडाळा मकरध्वज ता. चिखली 2. निलेश संतोष भारुडकर वय 32 वर्ष, रा. सातगाव भुसारी ता.चिखली 3. देविदास प्रकाश दसरे वय 28 वर्ष, रा. साखरखेर्डा ता.सिंदखेड राजा 4. सचिन परसराम घुबे वय 27 वर्ष रा देऊळगाव घुबे ता चिखली यांना दिनांक 21/12/2024 रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि 23/12/2024 पावेतो पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील तपास ठाणेदार संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका मोहीत्ो, जैवळ हे करीत आहे. तसेच पो. स्टे बिबी कडील स्टाफ नमुद सदर कारवाई करुन येत असतांना एक संशयीत स्कॉर्पीओ वाहन दिसुन आल्याने सदर वाहन थांबविले असता त्यातील इसम पळुन गेले वाहनाची तपासणी केली असता त्यात डिझेल चोरीकरीता 18 प्लास्टीक खाली कॅन ठेवल्याचे दिसुन आले त्यावरुन सदर संशयीत वाहन आणण्यात देखील डिटेन करण्यात आले आहे. पो.स्टे बिबी कडील पोलीस पथकाने समृध्दी महामार्गावर घडलेल्या डिझेल चोरीच्या गुन्हयाचा छडा लावुन आरोपी व वाहने असा मुद्रदेमाल हस्तगत केला आहे.पुढील तपास ठाणेदार संदिप पाटील, सफौ परमेश्वर शिंदे, नापोकॉ अरुण सानप, पोकॉ रविंद्र बोरे यांनी केली