आमदार साहेबांच्या प्रयत्नयाने बुलढाणायतील पत्रकारांना मिळाले विम्याचे 10.लाखाचे”कवच कुंडल
बुलडाणा पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आज बुलढाणा पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या मेगा कॅम्पद्वारे 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचे कवच सुमारे शेकडो पत्रकारांनी प्राप्त केले. बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून या योजनेंतर्गत अपघाती विम्याची तरतूद केली आहे.
मराठी पत्रकार संघाच्या आवाहनानंतर आयोजित या कॅम्पमध्ये पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला
या योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण, दवाखान्याचा 60 हजार रुपयांचा खर्च, मुलाच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये, ओपीडीसाठी 30 हजार रुपये, आणि अॅडमिट झाल्यास प्रतिदिन 1 हजार रुपयांची मदत या स्वरूपात कवच दिले जाते.
संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य शिबिर आयोजित करणाऱ्या मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाने याआधीच पत्रकारांना मोठा दिलासा दिला होता. आता संजय गायकवाड यांच्या या निर्णयामुळे पत्रकार व त्यांच्या कुटुंबांना मोठे आर्थिक संरक्षण मिळाले आहे.