अहिल्यानगर दि.२२-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले, काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.तत्पूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी त्यांचे स्वागत केले.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.